अंबरनाथमधील मनसेत अंतर्गत नाराजी उफाळली

अंबरनाथ – अंबरनाथ शहरात ऐन निवडणुकीत मनसेमधील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे प्रचारातून अनेक पदाधिका-यांनी काढता पाय घेतला आहे. यापैकी काही जणांनी शिवसेनेला छुपा दर्शविला आहे. त्यामुळे पक्षविरोधी काम करणाऱ्यांना काढून टाकणार, असा इशारा मनसे नेते राजन गावंड यांनी दिला आहे.

अंबरनाथमध्ये पक्षातील इच्छुकांना डावलून ऐनवेळी भाजपातून आलेल्या सुमेध भवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पक्षातील एक मोठा गट नाराज झाला आहे. हा गट प्रचारातूनही गायब आहे. मनसेने बुधवारी (16 ऑक्‍टोबर) निवडणुकीचा वचकनामा प्रसिद्ध केला. यावेळीही मनसेचा मोठा गट अनुपस्थित होता. त्यामुळे ही नाराजी प्रखरतेने जाणवली.

नाराजांपैकी काही जण शिवसेनेचा छुपा प्रचार करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या आहेत. त्यामुळे अशा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येईल, असा इशारा मनसे नेते राजन गावंड यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.