‘त्या’ ट्विटवरून विवेक आणि सोनम कपूरमध्ये वाद

भाजपा नेते आणि भाजपा समर्थक यांचा वाचाळपणा जगजाहीर आहे. एक्झिट पोलच्या निकालानंतर सोशल मीडियावर भाजप पक्षाचं खुलेपणानं समर्थन करणारा अभिनेता ‘विवेक ओबेरॉय’ने सोशल मीडियावर एक वादग्रस्त ट्विट केलं होत.

विवेकने ट्वीटमध्ये दुसऱ्या एका युझरचं मीम शेअर असून, या मीममध्ये विवेक स्वतः असून ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चनही दिसत आहेत. विवेकने हे मीम शेअर करत फक्त एग्झिट पोलचीच थट्टा उडवली नाही तर ऐश्वर्या रायचीही थट्टा उडवली होती. त्यामुळे सर्व स्तरातून विवेकवर टीकेचा भडीमार होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ‘सोनम कपूर’नेदेखील विवेकचा चांगलाच समाचार घेत ट्विटरवर त्याला उत्तर दिलं आहे.

मात्र, सर्वांनी टीका केल्यानंतरही विवेकला त्याचे काही वाटले नसून, उलट त्याने माध्यमांसमोर येऊन स्वतःचे समर्थन केलं आहे. आणि त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उलट सुनावलं आहे. विवेकने यामध्ये प्रामुख्याने ‘सोनम कपूरवर’ लक्ष केंद्रित केलं आहे.

‘मी गेल्या 10 वर्षांपासून महिला सशक्तीकरणासाठी विविध कामे करत आहे. मी जेव्हा ही कामे करत होतो, तेव्हा सोनम कपूर तिच्या मेकओव्हरवर काम करत होती’. मी सोनम कपूरला सल्ला देऊ इच्छितो की, तिने तिच्या चित्रपटांमध्ये ओव्हर अॅक्टिंग कमी करावी. आणि सोशल मीडियावर ओव्हर रिअॅक्ट करणे कमी करावे, असं विवेक म्हणाला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.