पुणे – “आधी ठाणे, नंतर छत्रपती संभाजीनगर तर आता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात घडलेले रुग्णों मृत्यू दुर्दैवी आहेत. पण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घटनेचे गांभीर्य नाही. तर आरोग्यमंत्री किरकोळ उत्तरे देत असून, त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा,’ अशी अशी मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
राज्यातील बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर पुण्यात पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, “राज्यात ऑक्सिजन आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण, लहान मुले दगावत आहेत. राज्यातील बहुतांश शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. मात्र, त्याकडे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे दुर्लक्ष करत आहेत,’ असे पवार म्हणाले.