कोपरगाव : कोपरगाव तालुका कोरोनामुक्त असताना बाहेरच्या पैपाहुण्यांनी प्रेमाने वानवळा म्हणून कोरोना दिला. शहरातील ओमनगर येथील एका डॉक्टराने तर कोरोना बाधीतांची साखळीच तयार केली. त्यांच्या कुटुंबातील ५ व्यक्ती कोरोनाबाधीत तर त्यांच्या रुग्णालयात काम करणारी महीला बाधीत निघाल्याने कोपरगाव तालुक्याला कोरोनाचा विळखा सुरू झाला आहे.
शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात ५ व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात बाधीत डॉक्टरची ६६ वर्षाचीआई, ४० वर्षाची बहीण,१२ वर्षाची मुलगी, येसगाव येथे राहणारी त्यांच्या रुग्णालयातील ३५ वर्षाची कर्मचारी व धारणगाव येथील एक बाधीत व्यक्तीचा १९ वर्षाच्या मुलाचा सामावेश आहे. पहिल्यांदा इतक्या संख्येने कोरोनाबाधीत रुग्ण एकाच कुटुंबातील निघाल्याने प्रशासनाची झोप उढाली आहे.
सध्या तालुक्यात १३ व्यक्ती कोरोनाबाधीत निष्पन्न झाले. त्यापैकी एका महीलेचा दोन महिन्यापूर्वी उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. ३ बाधीत व्यक्ती उपचार घेवून कोरोनामुक्त झाले. सध्या ९ कोरोना बाधीतावर उपचार सुरू असुन त्यापैकी आयशा कॉलनी, ओमनगर व सुरेगाव येथील बाधीतांवर अहमदनगर येथे उपचार सुरू असुन उर्वरीत बाधीतांवर कोपरगाव येथील कोव्हिड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहे. अशी माहीती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यानी दिली.
दरम्यान, शहरातील ओमनगर येथील कोरोनाबाधीत डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे कोरोना बाधीताची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश आले. बाधीत डॉक्टराने आपल्या बाधीत वडिलांना कोरोनाची लक्षणे आढळले असतानाही स्वतःच उपचार करण्याचा प्रयत्न केल्याने कोरोना संसर्गजन्य विषाणुची लागण संबधीत डॉक्टरांसह ,कर्मचारी, कुटुंबातील इतरांना झाली.
कोरोनाची बाधा झाल्यानंतर बाधीत डॉक्टरने प्रशासनापासुन अपेक्षीत माहीती लपवून ठेवल्याने बाधीत डॉक्टरांने यादरम्यान कोणा कोणावर उपचार केले. त्यांच्या दवाखान्यात किती रुग्ण उपचार घेवून गेले याची माहीती न दिल्याने अखेर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टरच्या तिजोरीचा टाळा तोडून नोंदणी वही ताब्यात घेतली. त्या वहीतील नावावरुन संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आत्ता पर्यंत ३२ व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्याची तयारी सुरु आहे.
बाधीत डॉक्टर प्रशासनाला कोणतेच सहकार्य करीत नाही, नियमाप्रमाणे ठरवून दिलेले औषध घेण्यास असमर्थता दाखवत आहे. आपल्या संपर्कातील व्यक्तींची माहीती लपवत असल्याने स्थानिक प्रशासनाने या बाधीत डॉक्टरवर जिल्हादंडाधिकारी अहमदनगर यांचेकडील आदेश क्रमांक आ.व्य.म.पु/कार्या/१९अ/१०४६/२०२० अन्वये कोरोना विषाणु (कोविड-१९) प्रदुर्भाव रोखन्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-१८९७ अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लघंन केल्याचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. अशी माहीती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. यापुढे नागरीकांनी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करून जिल्हा बंधी आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे सांगितले आहे.