लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व सेलिब्रिटींनी आपापल्या परीने मदतीचा हात पुढा केला होता. सिनेविश्वातील कामगारांसाठी सलमान खानने पुन्हा एकदा मदतचा हात पुढे केला आहे. सिनेमा क्षेत्रातल्या कामगारांसाठी सलमानने ह मदत दिली आहे.
या सर्व कामगारांच्या खात्यांमध्ये सलमानने प्रत्येकी 1500 रुपये जमा केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सिनेकामगारांच्या मदतीचे आश्वासन सलमानने दिले होते. त्याने आपले ते आश्वासन पूर्ण केले आहे.
फेडरेशन वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी ही माहिती दिली आहे. सलमान बॉलीवूडमधील एक दिलदार कलाकार आहे. जेंव्हाही कोणालाह मदतीच गरज असते तेव्हा सलमान नक्की मदत करतो असे त्यांनी म्हटले आहे.
आता जरी शूटिंग सुरू झाली असली तरी सर्व सिनेमांचे शेड्युल सुरू झालेले नाहीत. त्यामुळे सिनेकलाकारांच्या आर्थिक अडचण अजून दूर झालेल्या नाहीत. सलमानने पहिल्या लॉकडाऊनमध्ये त्याने बांधकाम मजुरांच्या खात्यांमध्ये 3-3 हजार रुपये जमा केले होते.
त्यांना यापुढेही जर गरज वाटली तर अशीच मदत करायची तयारी त्याने दर्शवली आहे. सलमानच्या दातृत्वाच्या अशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत. “राधे’ला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या पुढील सिनेमाबद्दल आता उत्सुकता आहे.