जगभरात 27 सप्टेंबरला “डॉटर्स डे’ साजरा केला जातो. मग या दिवसाचे सेलिब्रेशन बॉलीवूड सिलेब्सनेही धुमधडाक्यात साजरे केले. या दिवसाचे बी-टाउनच्या कलाकारांनी खास सेलिब्रेशन केले. अनेकांनी आपल्या मुलींसोबतचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.
बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी “डॉटर्स डे’निमित्त आपली मुलगी श्वेता बच्चनसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत बिग बीने पोस्ट केले की, “हॅपी डॉटर्स डे, प्रत्येक दिवस आपल्या मुलीसाठी समर्पित आहे.’ तसेच अजय देवगण यानेही आपली मुलगी न्यासासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझी मुलगी, न्यासा खुपच हुशार आहे. माझी सर्वात मोठी कमजोरी आणि स्ट्रेंथही तिच आहे. आता ती खूप मोठी झाली आहे. परंतु माझ्यासाठी आणि काजोलसाठी ती कायमच बेबी गर्ल असेल. हॅपी डॉटर्स डे.
दरम्यान, अक्षय कुमार, कुणाल खेमु, शिल्पा शेट्टी आणि नेहा धुपियासह अनेक सिलेब्सने डॉटर्स डेनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. या पोस्टला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळत असून हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.