पिंपरी – शहरात दररोज वाहनचोरीचे गुन्हे दाखल होत असतानाच आता हातातील मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरात एकाच दिवशी सहा दुचाकी चोरी आणि तीन मोबाइल हिसकावण्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
निगडी उड्डाण पुलाखाली लावलेली दीड लाख रुपयांची बुलेट चोरीस गेल्याची तक्रार शैलेश श्यामसुंदर पापत (वय 49, रा. वसंत विहार, झेंडे चौक चिखली) यांनी दिली आहे. सचिन काळभोर (वय 27, गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी, दळवी नगर निगडी) यांची दुचाकी राहत्या घराजवळून चोरीस गेली. धावडे वस्ती भोसरीतील भाजी मंडई येथे लावलेले वाहन चोरीस गेल्याची तक्रार मुनीर अहमद इलाहीबक्ष शेख यांनी दिली आहे.
चांदणी चौकाजवळील बंद पेट्रोल पंपाजवळ लावलेले वाहन चोरुन नेल्याप्रकारणी राजू लक्ष्मण शेंडगे (वय 32, रा. दत्तकृपा गणेशनगर, पिरंगुट) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास सुखदेव व्हरगर (वय 29, रा. माऊली बिल्डींग, देहू रोड) यांची दुचाकी राहत्या घरापासून चोरीस गेली. पोलॅरीज हॉस्पिटल समोरील रस्त्यावरून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद गोविंद लक्ष्मण कळसे (वय 22, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे.
हातातून मोबाइल हिसकावण्याचे प्रकार
देहू-चिखली रस्त्यावरील अभंग विश्व सोसायटी समोर रात्री पावणेनऊच्या सुमारास गणेश अशोक धायरकर (वय 38, धायरकर कॉम्प्लेक्स, जाधववाडी चिखली) रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी फोन हिसकवून धूम ठोकली. तसेच सारंग विनोदभाई गज्जर (वय 27, शिवतेज नगर, चिंचवड) रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरील चोरट्यानी मोबाइल हिसकावला. शाहूनगर चिंचवड येथील काका हलवाई दुकानासमोर रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मकरंद रामधारी यादव (वय 23) यांचाही मोबाइल पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी हिसकावून नेला. महात्मा फुले नगर पवना इंडस्ट्री समोर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली.