मुंबई – करोना महामारीत बॉलीवूडमधील अनेक सिलेब्रिटीजनी पुढाकार घेत लोकांना मदत केली आहे. कोणी पैसांची तर कोणी उपाशी असलेल्यांना अन्नदान करत मदत केली. हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे.विशेष करून सोनू सूद याने एक पाउल पुढे येत हजारो मजुरांना त्यांच्या स्वगृही पाठविले होते. यातच आता स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून भोजपुरी अभिनेता मनोज बाजपेयी याने खंत व्यक्त केली आहे.
काय म्हणाला अभिनेता मनोज बाजपेयी
गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया यांच्यावर कलाविश्वातील सध्या चर्चेत येत असलेली प्रकरणे, आंतरराष्ट्रीय घडामोडी यावर जास्त भर दिला जात आहे. मात्र, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा बाजूला पडला आहे.
दरम्यान, अलिकडेच मनोज बाजपेयीचं ‘बंबई में का बा’ हे भोजपुरी रॅपर सॉन्ग प्रदर्शित झालं. या रॅपरच्या माध्यमातून पहिल्यांदाच मनोज बाजपेयी एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला. या गाण्याच्या माध्यमातून स्थलांतरित मजुरांची सध्याच्या काळात होणारी फरफट, त्यांच्या समस्या यावर भाष्य करण्यात आलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने मनोज बाजपेयीने त्याचं मत व्यक्त मांडलं आहे.