…म्हणून सुनेने आधी भररस्त्यात सासऱ्यावर कुऱ्हाडीने केले ‘वार’; नंतर दगडाने ठेचून केली हत्या, नगर हादरले

अहमदनगर – सासरा सुनेच्या झालेल्या भांडणातून सुनेने सासऱ्याची भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वार केल्यानंतर सुनेने दगडाने सासऱ्यांचे डोके ठेचले आहे. सासरा सारखा चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे या दोघांमध्ये सारखे भांडण होत होते. त्यातून हा खून करण्यात आला आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथे घडली आहे.

अर्जुन गोविंद हजारे असे खून करण्यात आलेल्या ६३ वर्षीय सासऱ्याचे नाव आहे तर ज्योती अतुल हजारे असे आरोपी सुनेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असून सासऱ्याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.