5G लाँच होण्यापूर्वी सरकारचे मोठे विधान; 2023 मध्ये 6G होणार लाँच

नवी दिल्ली – भारतात 5G ची चाचणी अजूनही सुरू आहे. सर्वसामान्यांना 5G कधी मिळणार? यासाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु भारताने 6G साठी तयारी सुरू केली आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक विधान केले आहे. त्यामध्ये 2023 च्या अखेरीस भारतात 6G नेटवर्क कार्यान्वित होईल असे ते म्हणाले आहेत. अश्विनी वैष्णव यांनी एका मीडिया हाऊसच्या वेबिनारमध्ये हे वक्तव्य केले आहे.

6G तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी अभियंते आणि शास्त्रज्ञांना आधीच आवश्यक ती परवानगी देण्यात आली आहे. अश्विनी वैष्णव यांनीही याला दुजोरा दिला आहे. पुढे ते म्हणाले की, 6G साठी वापरले जाणारे सर्व सॉफ्टवेअर आणि इतर वस्तू ह्या स्वदेशी असणार आहेत. याशिवाय 6G साठी तयार असलेले मेड इन इंडिया पार्ट्सही निर्यात केले जातील. केवळ 6G नाही तर मेड इन इंडिया सॉफ्टवेअर आणि पार्ट्सचा वापर 5G साठी देखील केला जात आहे. असेही ते म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.