यजमान भारत आणि पाहुण्या श्रीलंका संघात मंगळवारी गुवाहाटीच्या मैदानावर मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय फलंदाजांची चमकदार कामगिरी पाहावयास मिळाली. कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांना मोठ्या खेळी खेळण्यात यश आले. रोहित आणि गिल आपल्या शतकापासून चुकले, मात्र विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४५ वे शतक झळकावले.
टीम इंडिया सज्ज! टी-20 नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचे लक्ष्य; उद्या दुसरा एकदिवसीय सामना!
दरम्यान, सामनाच्या दुसऱ्या डावात शेवटच्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना घडलेला क्षण पाहून रोहितचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना श्रीलंकन संघाचा कर्णधार दसून शनाका ९८ धावांवर नॉन स्ट्राईकवर होता. यावेळी शनाकाने चेंडू पाडण्याअगोदरच क्रीज सोडल्याने शमीने त्याला मंकडींग धावबाद केले. यावर मैदानातील पंच त्याला बाद ठरवणार त्या अगोदरच रोहितने आपले अपील माघारी घेतले. आम्ही आमचे गडी बाद करण्याचे अपील माघारी घेत असल्याचे पंचांना सांगितले. त्यानंतर पंचांनी शनाकाला फलंदाजी करण्यास परवानगी दिली.
The real winner was the sportsmanship of Rohit Sharma for refusing to take the run out. I doff my cap to you ! https://t.co/KhMV5n50Ob
— Sanath Jayasuriya (@Sanath07) January 10, 2023
मैदानावरील पंच नितीन मेनन यांना रोहितने अपील माघारी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर खेळाला सुरुवात झाली. श्रीलंकेच्या रजिथाने एक धाव घेऊन शनाकाला स्ट्राईक दिली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने चौकार मारला आणि आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने सहाव्या चेंडूवर षटकार खेचला. शनाकाने आपल्या संघाकडून झुंझार खेळी करत ८८ चेंडूंत १२ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १०८ धावा केल्या.
Not many captains would do this but hats off to @ImRo45 for withdrawing the appeal even though the law says so! Displaying great sportsmanship 👏 pic.twitter.com/Dm2U3TAoc9
— Angelo Mathews (@Angelo69Mathews) January 10, 2023
भारतीय संघाने दिलेल्या ३७३ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ३०६ धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे भारताने हा सामना ६७ धावा राखून जिंकला. ३ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या १-० ने आघाडीवर आहे. दोन्ही संघातील दुसरा एकदिवसीय सामना उद्या (गुरुवार) कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. भारतीय संघ टी-२० नंतर आता या एकदिवसीय मालिकेतही विजय मिळवण्यास सज्ज आहे.