देहूरोड येथील रुग्णालयावर कारवाईची ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनची मागणी
देहूरोड – देहूरोड येथील पुणे-मुंबई महामार्गालगतच्या एका रुग्णालयातील करोना बाधित रुग्णांच्या उपचारानंतर टाकाऊ साहित्यांची योग्य विल्हेवाट न लावता रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येत असल्याने कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे संत तुकाराम रुग्णालय येथे कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार केले जाते. या खासगी रुग्णालयाकडून रुग्णांच्या उपचारानंतर वापरलेल्या टाकाऊ मास्क, रबरी हात मोजे, पीपीई किट, जेवणाच्या कागदी थाळ्या व अन्य आरोग्य वापरातील साहित्यांचा योग्य विल्हेवाट न लावता शासकीय नियमाचा भंग करीत रहदारीच्या रस्त्यावर असणाऱ्या सार्वजनिक कचऱ्याच्या ठिकाणी टाकला जातो.
सार्वजनिक कचऱ्यात टाकल्यानंतर खाद्यासाठी भटकणारी जनावरे, भटकी कुत्रे, कचऱ्यातील कचरा विखुरतात. त्यामुळे जवळच असणाऱ्या वसाहतीतील नागरिक, लहान मुले तसेच बाजारपेठेत जाणारे येणाऱ्या नागरिकांना करोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बेजबाबदार असणाऱ्या रुग्णालय प्रमुखावर कारवाई करावी. अशी मागणी असोसिएशनचे उपाध्यक्ष मुजावर यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्याचे आरोग्य संचालक, प्रदूषण निवारण मंडळ, देहुरोड पोलीस ठाणे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
घटनास्थळाची पाहणी करण्याच्या सूचना
जिल्हा संघटक सचिव चंद्रशेखर पात्रे, आंबेडकरनगर विभागीय अध्यक्ष रज्जाक शेख, सामाजिक कार्यकर्ते गोपाल राव आदींनी पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या निदर्शनात अंतर आणताच तात्काळ पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे यांना घटनेची पाहणी करून पंचनामा करण्याची सूचना दिल्या.