मनसेचं खळखट्याक ! …तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार

Madhuvan

मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय ७९) यांचे कोविड न्यूमोनियामुळे निधन झाले.  आशालता यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

या घटनेमुळे चित्रपट आणि मालिकांचं शुटिंग आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आशालता यांना सुरक्षेच्या नियमांचं पालन न केल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. कोविड नियमांचं पालन न केल्यामुळेच ही घटना घडली असा आरोप मनसेच्या चित्रपट आघाडीने केला आहे.

यापुढे शुटिंगदरम्यान नियमांच पालन होत नाही असं आढळून आल्यास शुटिंग बंद पाडू असा इशार पत्र लिहून  आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आघाडीचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.