पिंपरी- रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करताना महावितरणच्या भूमिगत वायर आणि अन्य साहित्याचे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 मार्च रोजी काळाखडक ते वाकडकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. महावितरणचे सहाय्यक अभियंता सनी टोपे (वय 32, रा. वाकड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मे. एस. के. येवले अँड कंपनीचे संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड येथील काळा खडक ते वाकडकडे जाणा-या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम आरोपीच्या कंपनीला देण्यात आले आहे. वेस्टर्न अव्हेन्यू सोसायटी येथे काम सुरु असताना रस्त्याच्या कामात निष्काळजीपणा करत महावितरणचे सुमारे एक लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान केले.