वॉशिंग्टन – गेले तीन महिने अमेरिकेत गोळीबाराच्या अनेक घटना घडल्याने मुळचे अमेरिकन नसलेल्या नागरिकांत असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. परिणामी हे नागरिक दणकून हत्यारे खरेदी करत असल्याचे दिसून आले आहे. नवीन आकडेवारी आणि ट्रेंड नुसार अमेरिकेच्या इतिहासात गेल्या काही काळात सर्वाधिक बंदुका विक्री झाली आहे. त्यात खरेदी करण्याऱ्या ग्राहकात अर्धे आशियाई अमेरिकन आहेत आणि त्यातही चीनी जास्त आहेत.
अमेरीकेबाहेरून आलेले पण आता अमेरिकेचे नागरिक असलेले लोक या हल्ल्यांत सहज शिकार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना स्वरक्षणासाठी हत्यारांची गरज भासते आहे. अमेरिकेत शस्त्र खरेदीसाठीचे नियम कडक नाहीत. त्यामुळे काही काळापूर्वी शस्त्र खरेदी करण्यास बिचकणारे आशियाई अमेरिकन आता सर्रास शस्त्रखरेदी करत आहेत. त्यातही साउथ एशियन कम्युनिटीवर ज्या प्रमाणात गोळीबार होण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी हे लोक शस्त्र खरेदीला प्राधान्य देत आहेत.
असेही दिसून आले आहे की नागरिकांना करोना काळात जे मदत पॅकेज दिले गेले तेव्हा तोच पैसा शस्त्रखरेदीसाठी वापरला गेला. त्या काळात बंदूक खरेदीत मोठी वाढ दिसली. आता दुसरे मदत पॅकेज दिले जाणार आहे आणि त्यामुळे पुन्हा शस्त्रखरेदी वाढेल असा अंदाज शस्त्र विक्रेते व्यक्त करत आहेत.