‘दलित मुसलमानांना आरक्षण मिळाले पाहिजे’

file photo

हुसेन दलवाई : “दलित मुस्लिम व दलित मुसलमान’ या पुस्तकांचे प्रकाशन

पुणे – मुस्लिमांमध्येही जातीव्यवस्था आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यात दलित मुसलमान हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. मुसलमानात ओबीसी घटकांना आरक्षण मिळाले आहे. त्याचप्रमाणे दलित मुसलमान यानांही आरक्षणाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्व समाज एकत्रित येऊन लढा देण्याची गरज आहे, असे मत राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या विद्यमाने “दलित मुस्लिम व दलित मुसलमान’ या दोन पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मूळ लेखक व माजी खासदार अली अनवर, “एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुर्र रहेमान, सुगावा प्रकाशनच्या उषा वाघ, इब्राहिम खान, हलीमा खुरेशी, हीना खानसह आदी उपस्थित होते.

दलवाई म्हणाले, मुसलमानात दलित आहेत, हेही मला सुुरुवातीला माहीत नव्हते. अली अनवर यांच्या भेटीनंतर ही बाब लक्षात आली. त्याचप्रमाणे समाजालाही ही बाब लक्षात येत नाही. दलित मुसलमान हा प्रश्‍नही तितकाच महत्त्वाचा आहे.

मुसलमाना ओबीसी वर्ग आहेत, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही मागणी केली होती. त्यांना आरक्षण मिळाले. तसेच मुसलमानातील आदिवासींना आरक्षण मिळाले. मात्र मुसलमानातील दलितांना हिंदू धर्मातील दलितांप्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे. त्याबाबतचे विधेयक प्रलंबित आहे. या मागणीसाठी सर्व समाजाने एकसंध होण्याची आवश्‍यकता
आहे.

अब्दुर्र रहेमान यांनीही आपल्या भाषणात मुसलमानमधील दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळाले पाहिजे, असे सांगितले. हिना खान आणि हलीमा खुरेशी यांनी या दोन पुस्तकांतील वास्तवदर्शी चित्र मांडले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)