आळंदी (वार्ताहर) – देशाला हवेत शिवबा जिजाऊ म्हणून राखा महिलांचा मान, राष्ट्र करू बलवान, अशा आशयाचे स्टिकर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने रविवारी (दि. 15) आळंदी-दिघी वाहतूक विभागाच्या वतीने आळंदीत येणाऱ्या शेकडो रिक्षांना हे जनजागृती दर्शक फलक स्टिकर लावण्यात आले.
आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते स्टिकर चिटकवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आळंदी नगरपालिकेचे यात्रा समिती सभापती सागर बोरुंदिया, आळंदी-दिघी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. पी. गवारे, उपनिरीक्षक आर.सी. सोनवणे, पी. एन. काऱ्हाळे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक घोडके, अतुल कोरडे, वार्डनर दीपक जाधव , पीएमपीएमएलचे आळंदी शाखा वाहतूक प्रमुख विजय काळजी, तांबोळी, सुभाष कांबळे, गणेश कुऱ्हाडे, अरुण वावरे, विजय गोळे, दत्ता गांधीले, सिंकदर मुलाणी, महादेव पाखरे, सुनिल रेणके, संतोष डोळस आदींसह रिक्षाचालक-मालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितले की तिचा मान राखणारे स्टिकर हे आम्ही तुम्हाला देत आहोत. या स्टिकरचा मान आपणही राखून महिलांना आपल्या रिक्षामध्ये आपल्या भगिनीप्रमाणे वागणूक द्यावी व तीदेखील कोणाची तरी आई, बहीण आहे ही भावना ठेवून महिलांशी सन्मानाने वागावे, असे त्यांनी नमूद केले.