कराड – दैनिक प्रभातने चार वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात पदार्पण करत कराड-पाटणमधील वाचकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रभातच्या कराड विभागीय कार्यालयाचा शुक्रवार दि. 18 रोजी चौथा वर्धापन दिन मोठ्या दिमाखदार सोहळ्याने व मान्यवरांच्या शुभेच्छांनी संपन्न झाला.
कराड-पाटण भागातील वाचकांना चांगली सेवा देता यावी, यासाठी कराड येथे सुरु करण्यात आलेल्या कराड विभागीय कार्यालयाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, विधिज्ञ, कृषी, अभियांत्रिकी क्षेत्रातील कराड-पाटण तालुक्यातील विविध मान्यवरांनी दैनिक प्रभातच्या कराड विभागीय कार्यालयास भेट देऊन दैनिक प्रभातच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही दैनिक प्रभातच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी, दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, ब्युरो मॅनेजर जयंत काटे, वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, श्री. मुनीर सर, अमित शिंदे, राजेंद्र मोहिते, चैतन्य मंदरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवरांनी प्रभातच्या चार वर्षातील वाटचालीचे कौतुक करून वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या सडेतोड बातम्या, विशेष विषय, मुलाखती, लेख, राजकीय विश्लेषण आदींचे कौतुक करत आपले आपले अभिप्रायही दिले. तसेच दैनिक प्रभातच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी शेती मित्र अशोकराव थोरात, रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेतकरी नेते सचिन नलवडे,
माजी नगरसेवक हणमंतराव पवार, मनसेचे तालुकाध्यक्ष दादासो शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे, अँड. वसंतराव मोहिते, अँड. जयवंतराव मोहिते, रयत संघटनेचे उत्तमराव मोहिते (फौजी), ब्रम्हदास पतसंस्थेचे संस्थापक वसंतराव मोहिते (सर), भाजपचे रामकृष्ण वेताळ, सुधीर एकांडे, राजेश शहा, विजय भोसले, मनीषाशेठ सोलंकी, सुरेशशेठ सोलंकी, शेतकरी संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिन पाटील, विजय दिवस समारोह समितीचे प्रा. बी. एस. खोत, प्रा. दयानंद कराळे,
श्री शिवप्रतिष्ठानचे रवी डोंबे, शिवतेज युवा मंचचे गणेश कापसे, श्री. पारवे साहेब, हेळगावचे उपसरपंच संजय सूर्यवंशी, कचरेवाडीचे सरपंच काशिनाथ माने, अतुल मुळीक, नडशीचे माजी उपसरपंच भगवान थोरात, भरत थोरात, निगडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजीव घोलप यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते दिलीप भंडारे, मिलिंद भंडारे, तात्यासो थोरात, हजरत अली शिकलगार, सुहास पाटील, फिरोज शिकलगार यांनीही दैनिक प्रभातच्या वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांनी नोंदवले दै. प्रभातबद्धलचे अभिप्राय दैनिक प्रभातच्या चार वर्षातील वाटचालीचे कौतुक करत दैनिक प्रभातबद्धल आपला अभिप्राय नोंदवताना कराड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. सुहास कुलकर्णी म्हणाले, करोना कालावधीत प्रसार माध्यमांनी केलेले वृत्तांकन व त्यामाध्यमातून जनतेला दिलेला आधार लाख मोलाचा आहे.
त्याचप्रमाणे करोनामध्ये वैद्यकीय क्षेत्राने बजावलेल्या अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेला समाजासमोर आणण्याचे काम दैनिक प्रभातने प्रभावीपणे केले आहे. बदलत्या महाराष्ट्राचे प्रतिक, बलाढ्य, निर्भीड व लढवय्या दैनिक प्रभातच्या चौथ्या वर्धापन दिनास त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही दैनिक प्रभातबद्धल आपले अभिप्राय नोंदवत शुभेच्छा दिल्या.