पणजी : इफ्फी ला जाता यावे म्हणून काही जण वर्षभरातील सुट्ट्या साठवून ठेवतात आणि इफ्फी दरम्यान पणजी ला नक्की भेट देतात. त्यापैकीच एक आहे मेंगाणे कुटुंबीय. राजेंद्र मेंगाणे मूळचे कोल्हापूरचे आहेत पण गेली काही वर्ष मडगाव, गोवा कामानिमित्त राहतात. ते वर्षभरातील सुट्ट्या साठवून इफ्फी ला न चुकता भेट देतात. सुवर्णमहोत्सवी इफ्फी संदर्भात मेंगाणे कुटुंबीयांनी डिजिटल प्रभात कडे व्यक्त केलेले मत या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळते.