पुणे : महापालिकेच्या सभागृहनेतेपदाचा भिमाले यांना, स्थायी समिती अध्यक्षपदाचा सुनिल कांबळे यांना तर , पीएमपीएलच्या संचालकपदाचा सिध्दाथॆ शिरोळे यांना राजीनामा देण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. महापौर, उपमहापौर पदाचे पदाधिकारी बदलण्यात आल्यानंतर हे पदाधिकारी बदलण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील सत्तास्थपणा गोंधळामुळे ही प्रक्रिया मागे पडली. अखेर गुरुवारी त्याना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.