लखनौ : शमर ब्रूक्सच्या दमदार शतकी आणि जाॅन कैंपबेलच्या अर्धशतकीं खेळीच्या जोरावर विंडीजने अफगाणिस्तान विरूध्दच्या कसोटीच्या पहिल्या डावात महत्वपूर्ण ९० धावांची आघाडी घेतली आहे. दुस-या दिवशी विंडीजचा पहिला डाव ८३.३ षटकांत २७७ धावसंख्येवर संपुष्टात आला.
TEA in Lucknow 🍵
A crucial 34 with the bat, a five-wicket haul with the ball – what a debut it has been for Amir Hamza!
🌴 finish on 277, and lead 🇦🇫 by 90 runs. The star with the bat was Sharmarh Brooks, who scored his maiden Test century.#AFGvWI ▶️ https://t.co/iR2xwfpVsA pic.twitter.com/XXGWdllCQQ
— ICC (@ICC) November 28, 2019
कालच्या २ बाद ६८ धावसंख्येवरून पुढे खेळताना विंडीजच्या कैंपबेल आणि ब्रूक्सने संघाचा डाव सावरला. दोघांनी तिस-या विकेटसाठी ८४ धावा जोडल्या. आमिर हमजाने कैंपबेलला ५५ धावांवर बाद केले. त्यानंतर शाइ होप ७, शिमरन हेटमायर १३ आणि राॅसटन चेज २ धावांवर झटपट बाद झाले.
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या शेन डाॅरिचच्या मदतीने शमर ब्रूक्सने डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. डाॅरिच ४२ आणि ब्रूक्स १११ वर बाद झाल्यानंतर विंडिजचा एकही फलंदाज फार काळ मैदानावर तग धरू शकला नाही आणि विंडिजचा पहिला डाव २७७ वर संपुष्टात आला. त्यानंतर चहापानाकरिता खेळ थांबविण्यात आला.
TEA on Day 2
West Indies all out 277 — lead of 90 on first innings
Shamarh Brooks 111
John Campbell 55
Shane Dowrich 42🇦🇫v🌴. #AFGvWI
Live Scorecard ⬇️https://t.co/BUwjGoxgGr pic.twitter.com/xGRIKkWnBx— Windies Cricket (@windiescricket) November 28, 2019
अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत पहिल्या डावात आमिर हमजाने सर्वाधिक ५ तर राशिद खानने ३ गडी बाद केले. जाहिर खानने २ गडी बाद केले.
तत्पूर्वी अफगाणिस्तानचा पहिला डाव १८७ वर आटोपला होता. विंडिजकडून गोलंदाजीत रहकेम काॅर्नवालने सर्वाधिक ७ तर जेसन होल्डरने २ आणि जोमेल वाॅरिकने १ गडी बाद केला.