ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दररोज आंघोळ करणे हे शारीरिक आजारांना निमंत्रण देणारे ठरू शकते असं या संशोधनात म्हंटलं गेलं आहे. नित्यनेमाने आंघोळ करणे हा सर्वांच्याच दिनक्रमाचा एक भाग आहे. परंतु असे करणे हे अनेक आजारांना पोषक ठरू शकते. ( daily bath tips )
आपल्या शरीरावरील त्वचेमध्ये असलेल्या काही ग्रंथींमधून एक प्रकारचे तेल आपल्या त्वचेवर स्त्रवत असते. त्याचा एक तेलकट थर आपल्या त्वचेवर असतो, हे तेल त्वचेचे आरोग्य अबाधित ठेवण्यास मदत करते, हा तेलाचा थर त्वचेचे एकप्रकारे रक्षणच करत असतो.
आपण दररोज आंघोळ केल्यास त्वचेवरील हे तेल कमी होऊन त्वचा कोरडी होऊ लागते व यामुळे त्वचेचे अनेक आजार उद्भवू शकतात. दररोज आंघोळ केल्यास त्वचेसाठी आवश्यक असलेला हा तेलकट द्रव नाहीसा होऊ शकतो. मागील 50-60 वर्षांपासून आपल्याकडे दररोज आंघोळ केली पाहिजे असा चुकीचा समज रुढ झाला आहे. पुर्वीचे लोक दररोज आंघोळ करत नसत, असे मत तज्ञांनी नोंदवले आहे आणि त्याबरोबरच आवश्यक असेल तेव्हाच आंघोळ करा असा सल्ला ही त्यांनी दिला आहे.