दहिवडी, (प्रतिनिधी) – सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दहिवडी पोलीस ठाण्याला गुन्हे आढावा बैठकीत पाच पुरस्कार देण्यात आले.
यामध्ये गेल्या वर्षी डिसेंबर व यावर्षी जानेवारी महिन्यांमधील सर्वोत्कृष्ट नॉन-बेलेबल वॉरंट बजावणी पुरस्कार, 2023 मधील आणि यंदाच्या जानेवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार आणि आंधळी येथील दुहेरी खुनाच्या तपासाबद्दल पुरस्कार यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले असून, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा सुव्यवस्था राखली आहे.