ठाणे – हल्ली काही लहान मुले अगदी क्षुल्लक कारणांवरून थेट जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. नुकतेच ठाण्यातील भाईंदरमध्ये एका 13 वर्षांच्या मुलाने क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बारीक केस कापले म्हणून या मुलाने थेट इमारतीवरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या मुलाच्या चूलत भावाने त्याचे शॉर्ट हेअर कटिंग केली होते. याच कारणामुळे हा मुलगा नाराज झाला होता. त्यानंतर या मुलाने मंगळवारी रात्री कुटुंब झोपल्यानंतर टोकचे पाऊल उचलले. रात्री 16 व्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीमधून उडी मारून त्याने जीवन संपवले, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणचा पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या लहान मुले अगदी छोट्या- छोट्या कारणांवरून नाराज होतात. याचाच राग मनात धरून आत्महत्या सारखे निर्णय घेतले जातात. या आधी देखील PUBG खेळू न दिल्याने अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या.