मुंबई – कालपासून देशभरात गणेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली. पुण्यासह मुंबई सारख्या शहरांमध्ये गणरायाचे जोरदार स्वागत करण्यात आले. बॉलिवूडस्टार्सने आपल्या घरी गणेशाचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. अभिनेता सलमान खानचे बाप्पावरील प्रेम सर्वांना माहिती आहे. सलमान आपल्या घरी वाजत गाजत गणपती बाप्पा आणतो आणि बसवतो. गेली कित्येक वर्ष सलमान न चुकता हे काम करतो. यंदा सलमानने आपली बहीण अर्पिताच्या घरी आरतीसाठी हजेरी लावली.
नेहमीप्रमाणे यावेळीही सलमान खानने गणेश चतुर्थीला गणरायाची पूजा केली. मुंबईत सलमानची बहीण अर्पिता खान आणि अभिनेता आयुष शर्मा यांच्या घरी गणपती सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. कतरिना कैफ, विकी कौशल, रितेश देशमुखसह इतर अनेक स्टार्स देखील अर्पिताच्या घरी उपस्थित होते.
View this post on Instagram
सलमान खानने आपली बहीण अर्पिता खानच्या घरीही जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला. यावेळी सलमानने स्वतः ताट हातात घेऊन गणरायाची आरती केली. सलमानचा आरती करतानाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर फॅन्सने तुफान शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, पांढरा शर्ट आणि निळ्या डेनिम्समधील अभिनेता हातात आरतीचे ताट घेऊन आरती करताना दिसत आहे. गणेशाची आरती करण्यासोबतच सलमान टाळ्या वाजवतानाही दिसतो. या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सलमानने ‘गणपती बाप्पा मोरिया’ असे कॅप्शन देखील लिहिले आहे.