World Cup 2023 South Africa vs Australia 2nd Semi-Final : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे.
AUS vs SA Live Score : कोलकात्यात पाऊस थांबला, खेळ पुन्हा सुरू…
सध्या कोलकात्यात पाऊस थांबला असून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणारा विश्वचषक 2023 स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीतील सामन्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. मिलर आणि क्लासेन ही जोडी क्रीजवर आहे.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, दक्षिण आफ्रिकेनं 27.0 षटकात 4 बाद 95 धावांपर्यत मजल मारलेली आहे. सध्या डेव्हिड मिलर 36*(55) आणि क्लासेन 35*(38) क्रीजवर असून दोघांमध्ये 71 धावांची भागीदारी झालेली आहे.
तत्पूर्वी, 14 षटकानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 14 षटकांत 4 बाद 44 धावा झालेल्या होत्या.
आफ्रिकेला 24 धावांवर चौथा धक्का…
आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला. मिचेल स्टार्कने कर्णधार टेंबा बावुमाला यष्टिरक्षक जोश इंग्लिसकडे झेलबाद केले. बावुमा याला खातेही उघडता आले नाही. सहाव्या षटकात आठ धावांवर दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का बसला. क्विंटन डी कॉकला हेझलवूडकरवी कमिन्सने झेलबाद केले. त्याला 14 चेंडूत तीन धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट 22 धावांवर पडली. एडन मार्कराम 20 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद केले. रॅसी व्हॅन डर डुसेन 31 चेंडूत सहा धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले.
आफ्रिकेनं टाॅस जिंकला…
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बावुमाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. लुंगी एनगिडीच्या जागी तबरेज शम्सीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन बदल केले आहेत. मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अॅबॉट यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात या दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती.