World Cup 2023 India vs Afghanistan :- कर्णधार हशमतुल्लाह शहीदी आणि अजमतुल्लाह ओमरजई यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने भारतीय संघासमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यांनी 50 षटकात 8 गडी गमावताना 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या सध्या 21.3 षटकात 1 बाद 178 धावा झाल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर रोहित शर्मा 75 चेंडूत 115 धावावर आणि विराट कोहली 7 चेंडूत 8 धावावर खेळत आहेत.
रोहितने नुकतेच 63 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यासह तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. या बाबतीत रोहितने माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या 72 चेंडूत शतक झळकावले होते.
That 💯 feeling! 📸📸#TeamIndia | #INDvAFG | #MeninBlue | #CWC23 pic.twitter.com/AyMwCfBMmv
— BCCI (@BCCI) October 11, 2023
रोहितचे वनडे कारकिर्दीतील हे 31 वे शतक होते. (Rohit Sharma breaks Kapil Dev’s record of fastest World Cup hundred by Indian batter) तसेच, तो वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. या स्पर्धेत त्याच्या नावावर सात शतके आहेत. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला (सहा शतके) मागे टाकले आहे.