World Cup 2023 India vs Afghanistan :- कर्णधार हशमतुल्लाह शहीदी आणि अजमतुल्लाह ओमरजई यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने भारतीय संघासमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यांनी 50 षटकात 8 गडी गमावताना 272 धावा केल्या.
कर्णधार हशमतुल्लाह शहीदीने 88 चेंडूत सर्वाधिक 80 धावांचे योगदान दिले. त्याच्या खेळीत आठ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर अजमतुल्लाह ओमरजईने 69 चेंडूत 62 धावा केल्या.त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार मारले. या दोघांशिवाय अफगाणिस्तानच्या इतर अनेक फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. 22 धावा करणारा इब्राहिम झद्रान संघाचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
Innings Break!
4⃣ wickets for @Jaspritbumrah93
2⃣ wickets for vice-captain @hardikpandya7
1⃣ wicket each for @imkuldeep18 & @imShardTarget 🎯 for #TeamIndia – 273
Scorecard ▶️ https://t.co/f29c30au8u#CWC23 | #INDvAFG | #MeninBlue pic.twitter.com/8I5sFgrn6k
— BCCI (@BCCI) October 11, 2023
भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यानं 10 षटकांत 39 धावा दिल्या. तर हार्दिक पंड्यानं 7 षटकांत 43 धावा देताना 2 गडी बाद केले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. मोहमद सिराज हा महागडा गोलंदाज ठरला. त्यानं 9 षटकात 76 धाावा दिल्या.