Salman Khan – सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्याची प्रसिद्ध फ्रेंचाइजी टायगर 1 आणि 2 रिलीज झाली आहे. या मालिकेतील तिसऱ्या चित्रपट ‘टायगर 3’ (Tiger 3) ची सलमान खानने काही दिवसांपूर्वी ची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते या चित्रपटाची रिलीज डेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते.
सलमानचा (Salman Khan) ‘एक था टायगर’ हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये ‘टायगर जिंदा है’ रिलीज झाला होता. आणि आता सलमानच्या ‘टायगर 3’ (Tiger 3) या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करण्यात आला. आता या चित्रपटाचं नवं पोस्टर सलमाननं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमधील सलमानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
या पोस्टरमध्ये सलमान हा हातात बंदुक, भेदक नजर आणि ब्लॅक जॅकेट अशा लूकमध्ये दिसत आहे. सलमाननं टायगर 3 चित्रपटाच्या या नव्या पोस्टरला कॅप्शन दिलं, “टायगर आ रहा है, रेडी हो जाओ.!”
तसेच, सलमाननं टायगर 3 चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीज डेटची देखील माहिती दिली आहे. टायगर 3 चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.