किरीट सोमय्यांचा पत्ता कट; ‘मातोश्री’वरील टीका महागात पडली?

मुंबई : भाजपचे ईशान्य मुंबईतील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना पक्षाकडून आज जोरदार धक्का मिळाला आहे. भाजपतर्फे आज जाहीर करण्यात आलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीतून किरीट सोमय्या यांचे नाव वगळण्यात आले असून आता त्यांच्या जागेवर पक्षाकडून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती झाली असली तरी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपने किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यात येऊ नये असा आग्रह धरला होता. भाजपने किरीट सोमय्यांना उमेदवारी नाकारणे हे भाजपचे आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने उचलण्यात आलेले सावधगिरीचा पाऊल असल्याचं मानलं जात आहे.

तत्पूर्वी, भाजप व शिवसेना यांच्यामध्ये विधानसभा निवडणुका तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकांदरम्यान निर्माण झालेल्या दुराव्यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. किरीट सोमय्या यांनी लावलेले आरोप शिवसैनिक तथा पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या देखील चांगलेच जिव्हारी लागले होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या शिष्ठाचाराने शिवसेना भाजप युती झाल्यानंतरही किरीट सोमय्या यांच्याबाबत उद्धव ठाकरेंच्या मनात असलेली सल कायम राहिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये होते. अशातच आता भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची मागणी मान्य करत किरीट सोमय्यांना उमेदवारी नाकारली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.