संयुक्‍त राष्ट्रानंतर आता अमेरिकेकडून पाकला झटका:आर्थिक मदतीत कपात

वॉशिंग्टन : जम्मू-काश्‍मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रात तोंडावर पडलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी एक झटका बसला आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानला करण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानला आता फक्त 4. 1 अब्ज डॉलर दिले जाणार आहेत. अमेरिकेने मदतीमध्ये तब्बल 440 मिलियन डॉलरची कपात केली आहे. त्यामुळे अगोदरच पाकिस्तानमध्ये आर्थिक मंदीचे संकट असताना आता त्यात भर पडणार असल्याचे दिसत आहे.

पीईपीए करारातंर्गत अमेरिकेकडून पाकिस्तानला ही मदत केली जाते असे एका इंग्रजी वर्तमानपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्याच्या तीन आठवडेआधी हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेने पाकिस्तानला हा निर्णय कळवला होता. अमेरिकन कॉंग्रेसने ऑक्‍टोंबर 2009 मध्ये केरी लुगार बर्मन कायदा मंजूर केला. त्यानंतर सप्टेंबर 2010 मध्ये पाकिस्तान बरोबर पीईपीए करार करण्यात आला. त्याअंतर्गत पुढच्या पाच वर्षात पाकिस्तानला 7.5 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत देण्यात आली. केएलबी कायद्यातंर्गत 4.5 अब्ज डॉलरची मदत देण्यात येत होती. आता हा आकडा कमी करुन 4.1 अब्ज डॉलर करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)