IPL 2024 1st Match, RCB vs CSK :आता आयपीएल 2024 सुरू होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली आमनेसामने येणार आहेत.
IPL 2024 चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चेपॉक, चेन्नई येथे होणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करतील, चेपॉकमधील खेळपट्टी कशी असेल आणि दोघांपैकी कोण विजयाचा प्रबळ दावेदार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया….
पिच रिपोर्ट ( खेळपट्टी अहवाल)
CSK आणि RCB यांच्यातील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अतिशय प्रभावी ठरते. या मैदानावर फिरकीपटू फलंदाजांना खूप त्रास देतात. येथे बहुतेक फक्त कमी स्कोअरिंग सामने पाहिले जातात. खेळपट्टीचे खरे वर्तन सामन्यादरम्यानच कळणार असले, तरी फिरकीपटूंना मदत मिळणार हे नक्की. चेन्नईकडे मोईन अली, रवींद्र जडेजा आणि महिष तिक्षानासारखे काही दर्जेदार फिरकीपटू आहेत, ज्यांचा सामना करणं आरसीबीच्या फलंदाजांना कठीण जाऊ शकते.
मॅच प्रिडिक्शन (विजयाचा दावेदार)
चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर वर्चस्व राखले आहे. या स्पर्धेत दोघांमध्ये 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये सीएसकेने 20 जिंकले आहेत. तर, आरसीबीने केवळ 10 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. चेपॉकमध्ये दोन्ही संघांनी 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चेन्नईने 7 जिंकले आहेत, तर बेंगळुरूने फक्त 1 सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर वर्चस्व गाजवेल असे प्रिडिक्शन समोर येते.
RCB vs CSK : दोन्ही संघांची संभावित Playing 11 खालीलप्रमाणे –
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे/समीर रिझवी, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, महीश तीक्षणा आणि मुस्तफिज रहमान.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संभाव्य प्लेइंग इलेवन – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल/आकाश दीप आणि अल्झारी जोसेफ .