Purple Cap Winners in IPL (2008 – 2023) : आयपीएल 2024 आजपासून सुरू होत आहे. या मोसमातही अनेक गोलंदाज कहर करू शकतात. यावेळी आयपीएलचा 17वा मोसम खेळला जाणार आहे. ही लीग 2008 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून अनेक गोलंदाजांनी आपल्या घातक गोलंदाजीने पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. 2008 ते 2023 पर्यंत कोणत्या गोलंदाजांनी पर्पल कॅप जिंकली आहे ते जाणून घेऊया….
आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले. त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूही या लीगमध्ये खेळले होते. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर पहिल्या सत्रात वरचढ होता. त्याने आपल्या घातक गोलंदाजीने मोठ्या फलंदाजांना थक्क केले होते. राजस्थानकडून खेळताना तनवीरने 22 विकेट घेत पर्पल कॅपवर कब्जा केला होता.
Purple Cap Winners in IPL :-
2008- पाकिस्तानचा सोहेल तन्वीर (22 विकेट)
2009- भारताचा आरपी सिंग (23 विकेट)
2010- भारताचा प्रग्यान ओझा (21 विकेट)
2011- श्रीलंकेचा लसिथ मलिंगा (28 विकेट)
2012- दक्षिण आफ्रिकेचा मोर्ने मॉर्केल (25 विकेट)
2013- वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो (32 विकेट)
2014- भारताचा मोहित शर्मा (23 विकेट)
2015- वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो (26 विकेट)
IPL 2024 : कोहली ऐतिहासिक विक्रमाच्या जवळ, चेन्नईविरुद्ध फक्त 6 धावांची गरज…
2016- भारताचा भुवनेश्वर कुमार (23 विकेट)
2017- भारताचा भुवनेश्वर कुमार (26 विकेट)
2018- ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू टाय (24 विकेट)
2019- दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर (26 विकेट)
2020- दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा (30 विकेट)
2021- भारताचा हर्षल पटेल (32 विकेट)
2022- भारताचा युझवेंद्र चहल (27 विकेट)
2023- भारताचा मोहम्मद शमी (28 विकेट)
यंदाच्या मोसमात पर्पल कॅप जिंकण्याचे दावेदार
आयपीएल 2024 मध्येही अनेक गोलंदाज चमकदार कामगिरी करू शकतात. या हंगामात पर्पल कॅप जिंकण्यासाठी अनेक दावेदार आहेत. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क, रशीद खान, पॅट कमिन्स आणि दीपक चहर या गोलंदाजांचा या शर्यतीत समावेश आहे.
चेन्नई आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना….
आयपीएल 2024 आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भिडतील. जेथे RCB नवीन नाव आणि नवीन जर्सीसह प्रवेश करेल. तर चेन्नई नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे.