Indian Premier League 2024, CSK Playing 11 : इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. चेन्नईचा स्टार सलामीवीर डेव्हॉन कॉनवे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत जाणून घ्या, पहिल्या सामन्यात धोनी कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतो.
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 साठी आपल्या संघात अनेक खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यात न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेलसारख्या स्टार खेळाडूंचाही समावेश आहे. अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवी हा देखील धोनीच्या संघाचा एक भाग आहे. त्याच्या आगमनाने संघ अधिक मजबूत झाला आहे. मात्र, खेळाडूंच्या दुखापती हा चेन्नईसाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे.
कॉनवे-मथिशा पाथिराना दुखापतग्रस्त…
स्टार सलामीवीर डेव्हन कॉनवे दुखापतीमुळे मे पर्यंत आयपीएल 2024 मधून बाहेर राहणार आहे. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. पहिल्या सामन्यात खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. अशा स्थितीत कर्णधार एमएस धोनीला पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडणे हे जरा जड जाणार आहे.
Ranji Trophy 2024 : चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
रचिन रवींद्रला पदार्पणाची संधी…
डेव्हॉन कॉनवेच्या अनुपस्थितीत त्याचा देशबांधव फिरकीपटू रचिन रवींद्रला पदार्पणाची संधी मिळू शकते. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीसोबतच गरज पडल्यास रचीन फिरकी गोलंदाजीही करू शकतो. त्याचवेळी मिशेलला अंतिम अकरामध्ये स्थान मिळणे कठीण आहे.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रुतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे/समीर रिझवी, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, महिश टेकशाना आणि मुस्तफिझुर रहमान.