मुंबई – ड्रग्ज केस प्रकरणी मागील 26 दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या आर्यन खान याला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिला आहे.
Mumbai | Aryan Khan to walk out of Arthur Road Jail today a few weeks after he was arrested in drugs-on cruise-ship case
Jail officials gathered his bail orders at about 5.30am today from the bail box placed outside the Jail pic.twitter.com/Y4s8htVoh8
— ANI (@ANI) October 30, 2021
सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी मन्नतवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, जमीन मिळाल्यानंतर सुद्धा कोर्टाची ऑर्डर मिळाली नसल्याने आर्यनला कालची आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली आहे.
त्यानंतर आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. सकाळी 9 वाजेनंतर आर्यन खानच्या सुटकेची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती आहे. आर्यनला घरी आणण्यासाठी स्वतः किंग खान आणि पत्नी गौरी खान आर्थर रोड जेल कडे रवाना झाले आहेत.