निमसाखर -दगडवाडी (ता. इंदापूर) येथे महाशिवरात्रीनिमित्त “हर हर महादेव’चा जयघोष करीत हजारो भाविकांनी श्री नंदिकेश्वराचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिरात दर्शन व अभिषेकासाठी गर्दी झाली होती.
कळंब-बावडा या मुख्य रस्त्यालगत निरवांगीजवळ दगडवाडी हद्दीत असलेले हे मंदिर आहे. याबरोबर नीरा नदी किनारी व मंदिर परिसराताल मोठ्या झाडांमुळे सौंदर्यात भर पडली आहे. अशा या मंदिराभवती महाशिवरात्रीमुळे विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
दरम्यान मंदिरामध्ये हभप नाळे महाराजांच्या काल्याचे कीर्तन, श्री नंदिकेश्वर जीवन गौरव पुरस्कार वितरण, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ कार्यक्रम पार पडले.