पुणे -16 वर्षीय मुलीवर सावत्र पित्याने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 32 वर्षीय आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेने तक्रार दिली आहे. आरोपी सावत्र पिता हा मूळचा आसाम राज्यातील सलिचर येथील आहे.
सन 2016 पासून पीडित मुलगी घरी एकटी असताना वेळोवेळी आईला जीवे मारण्याची धमकी तिचा लैंगिक छळ केला. मात्र, सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेत कारवाई करण्याची मागणी होत आहे.