पुणे(प्रतिनिधी) – पुर्व वैमनस्य असलेल्या गोट्या नावाच्या व्यक्तीला भेटल्याने छोट्या उर्फ अभिषेक अलटेने एकावर धारदार शस्त्राने वार केले. गणेश ठाकुर (25,रा.बिबवेवाडी) असे वार करण्यात आलेल्या व्यक्तीने नाव आहे. या हल्लयात त्याच्या हाताची तीन बोटे तुटून पडली आहेत. ही घटना वानवडी येथील नेपीयर रस्त्यावर घडली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गणेश हा त्याच्या तोंड ओळखीच्या गोट्या नावाच्या व्यक्तीला रस्त्यात गळा भेट घेऊन भेटला होता. त्याचा राग छोट्या उर्फ अभीषेक व अँण्डी अलटे या दोघांना आला. त्यांनी गणेशला याचा जाब विचारत धमकावले.
अँण्डीने गणेशला शिवीगाळ करत कॉलर पकडली. तर छोट्याने पाठीमागुन कसल्यातरी धारदार शस्त्राने डोक्यात व हाताच्या बोटावर वार केले. यात त्याची करंगळी व शेजारील दोन बोटे तुटून पडली आहेत. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.