पुणे -पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या छोटा राजनच्या पुतणीला लष्कर पोलिसांनी अटक केली. तिला न्यायालयाने 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय 39, रा. वानवडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील इतर आरोपी धीरज बाळासाहेब साबळे (वय 26, रा. मुपो धानोरे, विकासवाडी, ता. खेड) आणि मंदार सुरेश वाईकर (वय 41, रा. बिबवेवाडी) या दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी राजेश जवळेकर (वय 48 रा. भाग्यतारा सोसायटी, कात्रज कोंढवा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 8 ते 13 मार्च 2020 दरम्यान हॉटेल अरोरा टॉवर लष्कर भागात घडली. याप्रकरणी सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी तिला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.