मनोज वाजपेयी यांची वेबसिरीज “द फॅमिली मॅन 2′ चा ट्रेलर 19 मे आज रोजी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. “द फॅमिली मॅन’ ही श्रीकांत तिवारी नामक एका मध्यमवर्गीय माणसाची कथा आहे.
View this post on Instagram
हा माणूस आपल्या कुटुंबासमोर अत्यंत घाबरट असल्याचे नाटक करतो, तर दुसरीकडे तो भारतातील सर्वोत्कृष्ट गुप्तहेरांपैकी एक आहे. नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीच्या एका विशेष पथकासाठी काम करणाऱ्या श्रीकांतच्या या दुहेरी आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित ही वेबसिरीज आहे.
View this post on Instagram
या वेबसिरीजचा पहिला सीझन गाजला होता. या वेबसिरीजमध्ये मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत असून सामंथा अक्किनेनी, प्रियमणी, शारीब हाश्मी, शरद केळकर, नीरज माधव, गुल पनाग यांच्या भूमिका आहेत.