पुणे – दुसऱ्या स्त्रीची अनैतिक संबंध ठेवून पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पती आणि त्याच्या आईविरोधात कोंढवा पोलिसांनी मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) अलृ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पती रेहान इलियास शेख (वय 31) आणि सासू फरीदा इलियास शेख (रा भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीने ऍड. साजिद शहा यांच्यामार्फत ही फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी आणि रेहान यांचा विवाह 2015 मध्ये झाला. त्यानंतर सुरूवातीला फिर्यादींना काही दिवस चांगले वागवण्यात आले. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात येत असत. पती काहीच काम करत नसल्याने ती उदरनिर्वाहसाठी मेहंदी काढण्याचे काम करत असत. त्यातून जे पैसे मिळतील, ते पती हिसकावून घेत असत.
पैसे न दिल्यास मारहाण करत असत. फिर्यादींने साठवलेले पाच लाख रुपये पतीने खर्च केले. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत असत. स्वत:मध्ये दोष असतानाही मूल होत नसल्याने पती आणि सासू जाच करत असत. माहेरहून 10 लाख रुपये घेऊन ये, म्हणून ढकलण्यात आले होते. त्याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. वारंवार दुसरे लग्न करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिली जात असत.
त्यावर या महिलेने पतीविरुद्ध तक्रार केल्याने त्याने पत्नीला तीन वेळा तलाक असे बोलून कोणतेही सबळ आणि कायदेशीर कारण नसताना बेकायदेशीरपणे तलाक दिला आहे. सासू हिने सतत हाताने मारहाण करुन पैशाची मागणी करुन शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट अधिक तपास करीत आहेत