फलटण – विनापरवाना गावठी हातभट्टीची विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्याला फलटण शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे फलटणमध्ये दारू विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे.
सोमवार पेठेत अवैध दारुचा धंदा चालू असल्याची माहिती फलटण शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर फलटण शहर पोलिसांनी सापळा लावून ही कारवाई केली.
सोमवार पेठ भागातील फिरंगाई मंदिराजवळ विनापरवाना गावठी हातभट्टीची विक्री करणाऱ्या राजेंद्र जेटिबा माने (रा. फिरंगाई मंदिराजवळ) या दारू विक्रेत्याला फलटण शहर पोलिसांनी शुक्रवारी दि. 10 रोजी सायंकाळी पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या दारू विक्रेत्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी या दारू विक्रेत्याकडून 500 रुपये किंमतीची हातभट्टी दारू जप्त केली आहे.