नवी दिल्ली – टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला थाटात प्रारंभ झाला. त्यात सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांनी यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा टोकियोत झालेल्या मूळ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक सात पदके जिंकली होती. त्याच खेळाडूंकडून प्रेरणा घेत तुम्हीही यशस्वी व्हा, अशा शब्दात सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
The #Paralympics games start tomorrow & my best wishes are with the entire 🇮🇳 contingent.
These women & men are athletes with extraordinary ability. They’ve overcome physical limitations through their passion, grit & commitment, and serve as an inspiration for us all.
Go India! pic.twitter.com/qE7GPgC00D
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 23, 2021
पॅरालिम्पिकमध्येही भरीव कामगिरी करून देशाला जास्तीत जास्त पदके मिळवून द्या, संपूर्ण देश तूमच्या कामगिरीकडे लक्ष लावून बसला आहे, अशा शब्दात कोहलीने खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताकडून 9 विविध क्रीडा प्रकारांत एकूण 54 खेळाडू सहभागी होत आहेत. या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह क्रीडा व अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनीही शुभेच्छा दिल्या आहेत.