क्रिकेटर रवींद्र जडेजाचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा

नवी दिल्ली – इग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची निवड झाल्यानंतर अनेक जणांनी आश्चर्य व्यक्त केले होते. रवींद्र जडेजा गेल्या काही दिवसांपासून खेळात अपयशी ठरत होता. त्यानंतर विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये रवींद्र जडेजाची निवड झाल्यानंतर, अगदी काही वेळातच रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभेमध्ये आपले समर्थन असल्याचे जाहीर केले आहे.

रवींद्र जडेजाने आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत मी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.

त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रवींद्र जडेजाचे हे ट्विट रिट्विट करत, विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल रवींद्र जडेजाचे अभिनंदन करत, विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, रविंद्र जडेजाच्या वडील आणि मोठ्या बहिणीने काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्याच्या पूर्वी रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबाने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

वाचा : रविंद्र जडेजाच्या वडील व बहिणीचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.