निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘या’ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार

पोलीस खात्याकडून प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविले होते प्रस्ताव

नगर: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 358 गुन्हेगारीलोकांना 24 एप्रिलपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. याशिवाय 436 जणांवर सशर्त कारवाई करण्यात आली आहे. तोफखाना, भिंगार, कोतवाली व एमआयडीसी पोलीस ठाण्यांचे हे प्रस्ताव असून, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर व नगर तहसीलदार उमेश पाटील यांनी हे आदेश काढले आहेत. निवडणूक काळात शहरात शांतता व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

13 एप्रिल रोजी रामनवमीचा उत्सव होता. 14 एप्रिलला आंबेडकर जयंती, 17 एप्रिलला महावीर जयंती व 23 एप्रिल रोजी लोकसभेचे मतदान आहे. या सर्व काळात शहरात शांतता राहावी, यासाठी भिंगार, तोफखाना, कोतवाली, एमआयडीसी पोलीस ठाण्यांकडून एकूण 797 जणांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर व तहसीलदार पाटील यांच्याकडे आले होते. त्यानुसार निर्णय घेत प्रांताधिकरी यांनी 262 जणांना हद्दपार केले.

यामध्ये हद्दपार व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे – धनंजय गाडे, संजय गाडे, अंकुश मोहिते, बबलू सूर्यवंशी, कुलदीप भिंगारदिवे, घनशाम बोडखे, गजानन भांडवलकर, बाबासाहेब गाडळकर, सचिन गवळी, दीपक घोडेकर, सय्यद आसिफ, आशिष शेख, वैभव जाधव, वैभव ढाकणे, वैभव दारूणकर, चेतन चव्हाण, नितीय जायभाय, सनी लोखंडे, पवन भिंगारदिवे, मोमीन अन्सारी, लालासाहेब शेख, हुसेन शेख, ईश्वर बेरड, शुभव जरे, ऋषिकेश हजारे, फिरोजखान पठाण, गणेश पोटे, किरण पिसोरे, राजेंद्र ससे, दीपक सूळ, सुरेश मेहतानी, सुदाम शिरसाठ, संजय दिवटे, काशिराम शिंदे, वैभव म्हस्के, शाहरूख पठाण आदींसह 262 जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.