मुंबई – बॉलीवूड आणि क्रिकेटविश्व यांचे संबंध हे वर्षानुवर्षापासून चालत आलेले आहेत. बॉलीवूडमधल्या अनेक नायिकांनी क्रिकेटविश्वातील आघाडीच्या खेळाडूंना भुरळ घातली आहे. यातील काही प्रकरणांचे नात्यांत रूपांतर झाले.
View this post on Instagram
सध्या अशाच एका प्रकरणाची चर्चा सुरू आहे. हे प्रकरण आहे बॉलीवूड अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटसंघातील फलंदाज के. एल. राहुल यांचे. बी-टाऊनमध्ये चाललेल्या चर्चांनुसार अथिया राहुलसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या सोशल मीडियावर यांच्या लग्नाच्या तुफान चर्चा रंगल्या आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर या दोघांचेही एकत्र अनेकदा फोटो व्हायरल झाले आहेत. अखेर हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे दिसत आहे. याच वर्षाच्या अखेरीस दोघांचा विवाह होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
View this post on Instagram
अलीकडेच केएल राहुलने अथियाच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या होत्या आणि सोबत एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघेही सोबत दिसून आले होते.
View this post on Instagram
क्रिकेटर के. एल. राहुल आणि अथिया शेट्टी हे गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, सुनील शेट्टी हा मंगळुराच आहे. तसेच के. एल. राहुलचंही मंगळूरशी खास नातं आहे. त्यामुळे राहुल आणि अथियाचा लग्नसोहळा हा दाक्षिणात्य रितीरिवाजाप्रमाणे होणार असल्याचेही सांगण्यात येतंय.