नवी दिल्ली – पंजाबमध्ये सरकार स्थापन करताच अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेटर हरभजन सिंग पंजाबमधून आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार असतील. असा निर्णय आम आदमी पक्षाकडून घेण्यात आला आहे. हरभजनला क्रीडा विद्यापीठाची महत्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची दाट शक्यता आहे.
क्रिकेटर हरभजन सिंगला आम आदमी पक्षाने राज्यसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. याशिवाय क्रीडा विद्यापीठाची महत्वाची जबाबदारीही त्याच्याकडे सोपविली जाऊ शकते. निवडणूक प्रचारादरम्यानच भगवंत मान यांनी जाहीर केले होते की, त्यांच्या कार्यकाळात पंजाबमध्ये खेळांना भरपूर प्रोत्साहन दिले जाईल. जालंधरमध्ये क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येईल, यावरही भर देण्यात आला होता. आता हरभजनला राज्यसभेचे उमेदवार बनवण्यात आले आहे, अशा स्थितीत त्यांच्याकडे क्रीडा विद्यापीठाची जबाबदारीही सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसे झाले तर पंजाबमध्ये खेळांबाबत हा मोठा संदेश जाईल.
या महिन्याच्या अखेरीस आम आदमी पार्टीला राज्यसभेसाठी पाच जागा मिळणार आहेत. यामध्ये हरभजन सिंगचे पहिले नाव समोर आले आहे. आम आदमी पार्टीच्या हायकमांडने हरभजन सिंगच्या नावाला ग्रीन सिग्नल दिला आहे.