पुणे – अजिंक्य क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत अजिंक्य क्रिकेट क्लब संघाने 2 एन् क्रिकेट अकादमी संघाचा एक चेंडू राखून पराभव करत रोमहर्षक विजय मिळवला.
या स्पर्धेत साखळी फेरीत अजिंक्य क्रिकेट क्लब संघाने 2एन् क्रिकेट अकादमी संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना 2 एन् क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 7 बाद 102 धावा केल्या.
अटीतटीच्या झालेल्या लढतीत 102 धावांचे लक्ष अजिंक्य क्रिकेट क्लब संघाने केवळ एक चेंडू राखत 5 गडी गमावून 103 धावांसह पूर्ण केले. अष्टपैलू कामगिरी करणारा ऍरॉन गायकवाड सामनावीर ठरला.