पुणे – कर्मा 9 टी-20 कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पुणे रॉयल स्ट्रायकर्स, ट्रोजन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
सलामीच्या सामन्यात सुजा सुल्तान (5-11) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुणे रॉयल स्ट्रायकर्स संघाने अयोध्या वॉरियर्स संघाचा 9 गडी राखून पराभव केला. अयोध्या वॉरियर्स संघाचा डाव 12.3 षटकात 59 धावांवर संपला. हे आव्हान पुणे रॉयल स्ट्रायकर्स संघाने केवळ 4.5 षटकात 1 बाद 63 धावा करून पूर्ण केले.
सामन्याचा मानकरी सुजा सुल्तान ठरला. दुसऱ्या सामन्यात प्रसाद गिरकर (नाबाद 67 धावा) याने केलेल्या खेळीच्या जोरावर ट्रोजन्स संघाने ए अँड डायजेस्ट संघाचा 6 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.