पुणे – ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी आयोजित लिटल कुमार चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धेत राघव सरोदे याने, तर मुलींच्या गटात रित्सा कोंडकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
राघव सरोदे याने पाचव्या मानांकित सक्षम भन्साळीचा 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. समीहन देशमुख याने रुद्र मेमाणेचा 6-1 असा तर, क्षितीज अमीनने प्रत्युष बगाडेचा 6-0 असा पराभव केला.
रित्सा कोंडकर हिने आठव्या मानांकित काव्या तुपेचा टायब्रेकमध्ये 6-5(5) असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. मृणाल शेळकेने वीरा हरपुडेला 6-1 असे नमविले.